योगीराज प. पू.
बालदास महाराज
प.पू. बालदास महाराज हे एक महान आध्यात्मिक गुरू आणि सिद्ध संत होते, ज्यांचे जीवन ईश्वरभक्ती आणि लोककल्याणासाठी समर्पित होते. त्यांनी आपल्या शिकवणीतून नामस्मरण, संयम आणि निस्वार्थी सेवेचा मार्ग दाखवला, ज्यामुळे हजारो भक्तांना मन:शांती आणि योग्य दिशा मिळाली.
प.पू. बालदास महाराज सेवा ट्रस्ट
योगीराज प.पू. बालदास महाराज समाधी मठ शिरगांव या ठिकाणी प.पू. बालदास महाराज सेवा ट्रस्ट या विश्वस्त संस्थेची स्थापना झाली आहे. महाराजांचे भक्त संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत.
मुंबई या ठिकाणी असणाऱ्या भक्तांनी एकत्र येऊन प.पू. बालदास महाराज सेवा संघ (मुंबई) या संस्थेची स्थापना केली आहे. सदर संस्थेच्या माध्यमातून योगीराज महाराजांच्या समाधीच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले जाते.
गुरू परंपरा
पुराण काळापासून सांगता येईल असे भारताचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची 'गुरु-शिष्य परंपर' होय! गुरूंशिवाय तरणोपाय नाही. शिष्याच्या जीवनातील अंध:काराचा नाश करून त्याचे परब्रह्माशी मिलन घडवून आणण्याचे कार्य गुरु करतात.

प. पू. जंगली महाराज
प. पू. श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर यांचे गुरु

प. पू. श्रीकृष्ण महाराज नेर्लेकर
योगीराज प. पू. बालदास महाराज यांचे गुरु
